कोल्हापूर - "बंद होवू दे कोरोनाची वार्ता, नाद पुन्हा घुमू दे, तूच सुखकर्ता, तूच दुःखहर्ता...' अशी साद घालत आज सर्वत्र विघ्नहर्त्या गणरायाचे आगमन झाले. उद्या (शनिवारी) दिवसभरही गणेश आगमन होणार असून सर्वत्र बाप्पांची प्रतिष्ठापना होणार आहे. सार्वजनिक मंडळांच्या कार्यकर्त्यांनीही आजच मोठ्या संख्येने मात्र मोजक्याच कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत मुर्ती नेल्या. "बाप्पा मोरया'च्या गजराने कुंभार गल्ल्या दुमदुमून गेल्या.